चिचोंडी शिराळ येथे चोरांचा धुमाकूळ

एकाच रात्री दहा ठिकाणी चोऱ्या

पाथर्डी – तालुक्‍यातील चिचोंडी (शिराळ) येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री दहा ठिकाणी चोऱ्या केल्याची घटना घडल्याने चिचोंडीमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. या चोरीच्या घटनेमध्ये सुमारे 35 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला. याबाबत सविस्तर माहीती अशी की, चिचोंडी येथील सोमनाथ पालवे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरातील कपाटाची उचका पाचक करून घरातील पंचवीस हजार रुपये, गोविंद नजण यांच्या घरातील घरातील रोख आठ हजार रुपये, मधुकर पावसे यांच्या घरातील दीड हजार रुपये चोरून नेले.

येथील चंद्रकांत इपरकर, पंडीत सराफ, संजय कांबळे, मधूकर पावसे, शहादेव गीते यांच्या घरात व दुकानात घुसुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. कैलास आव्हाड यांच्या मेडीकलमध्ये तिसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केला. तर शिराळ येथील दिलीप गुगळे, अर्जून गायकवाड यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

कैलास आव्हाड यांच्या मेडीकलमध्ये चोरी करण्यासाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असुन यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेले सुटाबुटातील पाच तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसुन येत आहेत. आव्हाड यांच्या मेडीकलमध्ये काहीच मिळून न आल्याने तेथील कॅडबरी चॉकलेट घेवून चोरटे पसार झाले. चिचोंडी येथे एकाच रात्री आठ ठिकाणी तर शिराळ येथे दोन ठिकाणी चोरी झाली.

चिचोंडीमध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला. पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी श्वानपथक, ठसे तज्ञासह येवून चोरीची माहिती घेतली. या चोरीचा त्वरित तपास करून, चिचोंडी येथे पोलीस चौकीसाठी शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा अशी मागणी सरपंच एकनाथ आटकर यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)