पाडव्याला नामभारत चळवळीस प्रारंभ

नगर – पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनच्यावतीने गुरुवारी 8 नोव्हेंबरला राजमाता जिजाऊ ‘पाडवा’ साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मानसिक गुलामगिरी झूगारुन बदल घडविण्यासाठी नामभारत चळवळीस प्रारंभ करण्यात येणार आहे. या चळवळीच्या माध्यमातून निवडणुकीतील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी नागरिकांमध्ये उन्नत चेतनेचा विकास केला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

मानसिक गुलामगिरीने जोखडलेले नागरिक मतदान प्रक्रियेत आपली सक्षम भूमिका बजावत नाही. अनेकजन मतदान करीत नाही तर काही जन पैसे घेऊन मतदान करतात. यामुळे प्रगल्भ लोकशाही असतित्वात न येता, भ्रष्ट राजकारणी निवडून येतात. या राजकारण्यांमुळे सर्वसामान्यांचे प्रश्‍न न सुटता विकास खुंटतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नामभारत चळवळीच्या माध्यमातून नागरिकांचा आंतरिक विकास केला जाणार आहे. यामध्ये आप-आपल्या धर्मातील नामस्मरण करुन मतदनाचे कर्तव्यपालन शुध्द विचार व हेतूने करण्याचे आवाहन केले जाणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये बदल घडून, मतविक्री थांबून, विवेकबुध्दीने केलेल्या मतदानाने चांगले उमेदवार निवडून आनण्याचे उद्दीष्ट असल्याचे अॅड. गवळी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)