सेंट्रल बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांकडून बेरोजगार युवकांची अडवणूक

शेख यांचा उपोषण व आत्मदहनचा इशारा

नेवासे – येथील सेंट्रल बॅंकेच्या शाखाधिकाऱ्याकडून कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी अडवणूक होत असल्याच्या निषेधार्थ उपोषण व आत्मदहन करण्याचा इशारा अल्पसंख्यांक सेलचे नेवासा कॉंग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष जाकिरभाई शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात शेख म्हटले, अल्पसंख्याक समाजातील काही युवकांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज प्रकरण केलेले होते. पीएमइजीपी या योजनेअंतर्गत केंद्र शासनाची ही योजना असतांना सदर बॅंकेने अल्पसंख्याक समाजातील काही बेरोजगार युवकांची कर्ज प्रकरणे नामंजूर केले. बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतांना तरुण युवकांना उद्योग व्यवसायासाठी केंद्र शासनाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत प्रकरणांना मंजुरी दिली असतानाही नेवासा सेंट्रल बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांनी प्रकरणे बॅंकेत येऊन तीन महिने झाले तरी विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.

याबाबत अधिकाऱ्यांनी युवकांशी सविस्तर चर्चा करून व माहिती घेऊन हे प्रकरणे मार्गी लावावेत अन्यथा 12 नोव्हेंबर रोजी बॅंकेसमोर आमरण उपोषण तर 14 नोव्हेंबर रोजी बॅंकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा जाकिरभाई शेख यांनी तहसीलदार व सेंट्रल बॅंकेच्या शाखाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी जिल्हा उद्योग केंद्र यांना देखील निवेदन देऊन कळविले आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)