विजेचा शॉक बसून श्रीरामपुरात विद्यार्थ्याचा मृत्यू

file photo

टाकळीभान  – श्रीरामपूर तालुक्‍यातील भोकर येथे पढवीत वीजप्रवाह उतरल्याने शॉक बसून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.2) रात्री आठच्या सुमारास घडली. या अपघातात अभिजीत सोपान ढाले (वय 12) याचा मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी की, सोपान रखमाजी ढाले हे भोकर परिसरात प्रभाग क्रमांक तीन मध्ये राहतात. शुक्रवारी त्यांनी नेहमीप्रमाणे गायीची धार काढली. त्यानंतर मुलगा अभिजित यास घरासमोरील पडवीला टांगलेल्या लोखंडी अकड्याला दुधाची बादली टांगण्यास सांगीतली. मात्र या कडीत वीजप्रवाह उतरला असल्याने अभिजित दुधाची बादली लटकवत असताना त्याला शॉक बसला. जोराचा झटका बसल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ मदतीला आलेल्या शेजारील युवकांनी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालय येथे नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अभिजित हा भोकर येथील जगदंबा प्रासादिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. एका चुणचुणीत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज (दि. 3) अभिजितवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)