कब्रस्थानच्या भिंती बांधून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

नगर – अहमदनगर पहिली मंडळी कॉंग्रीगेशनल (अ.प.मं. कॉंग्रीगेशनल) न्यास नोंदणी डी-18 संस्थेच्या मालकीची सिद्धार्थनगर येथील स्मशानभूमी आहे. या न्यासाचे अधिपत्याखाली असलेल्या (ह्युम मेमोरियल चर्च) सभासद व भक्‍तीजन यांच्याकरीता असलेल्या सिद्धार्थनगर येथील स्मशानभूमीच्या भिंती पडलेल्या आहेत.

या भिंतीबाबत सध्याचे स्वयंघोषीत विश्‍वस्त विंनती करूनही ते पडलेल्या भिंतीचे बांधकाम करीत नाहीत. या स्मशानभूमीमध्ये मान्यवर ख्रिस्तवासी रेव्ह. नारायण वामन टिळक व ख्रिस्तवासी भास्कर पी. हिवाळे यांच्या या स्मशानभूमीमध्ये कबरी आहेत. तसेच ह्यूम मेमोरियल चर्चचे भक्‍तजणांच्या, सभासदांच्या, नातेवाईकांच्या विसावा पावलेल्या प्रियजनांच्या दफनभूमीत कबरी आहेत. त्यावरती धार्मिक चिन्हे क्रॉस व बायबल मधील वचने देखील लावण्यात आलेली आहेत.

-Ads-

काही कबरींचे बांधकाम पक्के केलेले आह. परंतु या भिंती पडल्यामुळे क्रॉस व चिन्हांची मोडतोड केली जात आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. यासाठी आपण आपल्या सहकार्याने अधिपत्याखाली सदर भिंतीचे बांधकाम केल्यास योग्य होईल. तसेच तेथे अंत्यविधी होताना आवश्‍यक असणारी प्राथमिक व्यवस्थाही नाही. उदा. प्रार्थनेकरीता शेडची व्यवस्था, पिण्याचे पाणी, पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी.

हे कब्रस्तान ऐतिहासिक असल्यामुळे भिंती पडल्यामुळे क्रबस्तानाला भग्न व विद्रुप स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच आतमध्ये जनावरे येऊन कबरीचे नुकसान करतात, कबरींवर वाहिलेली फुले खातात व े घाण करतात व त्यामुळे त्या ठिकाणी कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.याप्रकारामुळे ख्रिस्तीबांधवांच्या भावना दुखावल्या जात आहे. म्हणून आमच्या धार्मिक भावना व अस्मितेची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून पडलेल्या भिंतीचे बांधकाम त्वरित करून देण्यात यावे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)