राजकीय हव्यासापोटी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

आमदार मोनिका राजळे यांची विरोधकांवर टीका : विकास कामास प्रारंभ

शेवगाव – सद्यस्थितीची जाण असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच दुष्काळ जाहीर केला असताना विरोधक केवळ राजकीय हव्यासापोटी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोर्चाचे नाटक करत आहेत. राजकारण करण्याची ही वेळ नाही, असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.

तालुक्‍यातील आखतवाडे येथील हनुमान मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या दहा लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमिपूजन आ. राजळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापूसाहेब भोसले, वाय. डी. कोल्हे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब सोनवणे, सरपंच वर्षा सोनवणे, आसाराम नऱ्हे, शिवाजी भिसे, बशीरभाई पठाण, रामदास बडे, भागवत महाराज उगले, सरपंच गणेश कराड , वडुलेचे सरपंच बाळासाहेब आव्हाड आदी उपस्थित होते .

आमदार राजळे म्हणाल्या, दुष्काळाच्या दृष्टीने आवश्‍यक ते सर्व नियोजन आपण केले असून तातडीच्या बाबींची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे. जलसंवर्धनाच्या कामासाठी तसेच रखडलेल्या रस्ते आदी विकास कामासाठी जिल्ह्यात सर्वाधिक निधी आपल्या मतदारसंघात आलेला आहे. शेतीच्या पाण्याच्या नियोजनासाठी जाणीवपुर्वक टेल टू हेड असे नियोजन केले आहे. जनतेने घाबरू नये, दुष्काळाच्या दृष्टीनें आवश्‍यक ती कोणतीही कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील, असा दिलासा त्यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)