कामाच्या माध्यमातून जनतेने स्वीकारले : डॉ. सुजय विखे

कर्जत – तुम्ही लोकांची कामे वेळेत केली असती तर, मी इथे आलो नसतो. लोकांनी बोलावल्याने आरोग्य सेवेच्या माध्यमातून काम सुरू केले. या भागातील जनता अनेक दशकापासून विखे कुटुंबाशी जोडलेली आहे. आमच्या कामाच्या माध्यमातून जनतेने आम्हाला स्वीकारले आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले.

तालुक्‍यातील माहीजळगाव येथे जनसेवा फाऊंडेशन आयोजित आरोग्य शिबीर समारंभात ते बोलत होते. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा बॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, ऍड. कैलास शेवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश यादव, बाळासाहेब साळुंके, युवक कॉंग्रेस अध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, रत्नमाला कांबळे, माजी सरपंच प्रकाश कदम, उपसरपंच नारायण शिंदे, जयेश कांबळे, रामभाऊ शेटे, जालींदर माळी, शंकर जाधव, बाळासाहेब जाधव, बाबासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विखे पुढे म्हणाले, 21 व्या आरोग्य शिबिरात अडीच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत झालेल्या आरोग्य शिबीरात 25 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. लोकांची दुःख मला चांगली समजतात. आजारांच्या उपचारांसाठी मोठा खर्च येतो. सामान्य माणूस हा खर्च करू शकत नाही. त्यामुळे रुग्णसेवेचे व्रत हाती घेतले आहे.

मला खासदार होण्यासाठी फिरण्याची गरज नाही. विळदघाट हॉस्पिटलला राउंड मारला तरी मी खासदार होईल. मात्र येथील जनतेने बोलविल्याने मी आलो आहे. यावेळी कैलास शेवाळे, प्रवीण घुले, बापूराव गायकवाड यांची भाषणे झाली.
प्रविण खेडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दादा शिंदे यांनी सूत्रसंचालन तर, श्रीमंत कदम यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)