सरदार गंधे गढी जिणोद्धारबाबत शासन उदासीन

नगर – दिल्लीचे पहिले मराठा शासक व छत्रपती शाहु महाराज (थोरले) यांचे विश्‍वासू मुत्सद्दी सरदार अंताजी माणकेश्‍वर गंधे हे मुळे नगर तालुक्‍यातील कामरगावचे असून त्यांनी हे गाव वसविले. या गावात त्यांचे स्मारक व गडीचा जिणोद्धार व्हावा म्हणून सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. परंतू गेल्या काही महिन्यापासून प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव मंत्रालयात धुळखात पडून आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घावून ऐतिहासिक पुरातन वास्तूचे जतन करावे अशी मागणी गंधे स्मृती विश्‍वस्तांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पारनेर तालुक्‍यातील सुपा येथे कार्यक्रमानिमित्त येणार आहे. त्या पार्श्‍वभूमिवर गंधे स्मृती विश्‍वस्त मंडळ मुख्यमंत्र्यांनी भेट घेवून स्मारक व जिणोद्धाराचा शासनाकडे पाठविलेल्या प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी करणार आहेत. 9 कोटी 18 लाख 14 हजार रुपये खर्च या स्मारक व गढीच्या जिणोद्धारास अपेक्षित आहे. 28 मार्च 2018 मध्ये प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तो प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याबरोबर जिल्हा प्रशासन व तहसीलदार देखील याबाबतच्या स्थानिक अडचणी हेतू पुरस्कार टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे 2015 पासून मंत्रालयातून आदेश होवूनही याबाबत कार्यवाही झालेली नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना द्यावे अशी मागणी गंधे न्यासाचे प्रमुख योगेश्‍वर गंधे, उपाध्यक्ष विष्णू गंधे, भाजपचे सावेडीचे सरचिटणीस मुकुल गंधे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)