शहरात धूमस्टाईलने चोरी करणारे तिघे आष्टीचे

कोतवाली पोलिसांनी केली अटक : केडगावमधील चोरी दिली माहिती

नगर  – शहरात धूमस्टाईलने महिलांचे दागिने व पर्स लांबविणाऱ्या तिघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. यात एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अटक केलेले तिघे आंभोरा (ता. आष्टी, जि. बीड) येथील आहेत. प्रदीप सुभाष लोखंडे (वय 21), नामदेव बबन निकम (वय 20) व अल्पवयीन बालक (तिघे रा. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कल्पना संधू यांचे 12 ऑक्‍टोबरला केडगाव येथे या तिघा चोरांनी धूमस्टाईलने पर्स चोरून नेली होती. कल्पना संधू व त्यांची मुलगी दुचाकीवरून जात असताना चोरांनी दुचाकीवरून येत त्यांच्या हातातील पर्स चोरून नेली होती. पर्समध्ये दीड तोळ्याचे दागिने, मोबाईल व सहा हजार रुपये रोख होते. कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद होताच, चोरांचा शोध सुरू केला होता.

पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी कोतवाली हद्दीत होत असलेल्या चोरांची आणि त्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांची माहिती खबऱ्यांकडून घेतली. शहरात सध्या सुरू असलेल्या धूमस्टाईलच्या चोऱ्या या आष्टीकडून आलेले चोर करत आहेत, अशी माहिती पुढे आले. त्यानुसार खबऱ्यांकडून माहिती घेत वरील तिघांना अटक केली.

या तिघांनी केडगाव येथे केलेल्या चोरीची माहिती दिली आहे. या तिघांकडून शहरातील आणखी काही ठिकाणी झालेल्या चोरीची माहिती मिळू शकते, असा अंदाज आहे. त्यानुसार पोलीस या तिघांकडे तपास करत आहेत. शिवाजी नागवे, रायंद पालवे, नितीन गाडगे, शाहीद शेख, मुकुंद दुधाळ, संदीप गवारे, राजू शेख, भारत इंगळे, प्रमोद लहारे, चेतन मोहिते व सायबर सेलचे राहुल गुंडू हे पोलीस कर्मचारी चोरांचा शोधासाठी तपासात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)