पुणतांब्याच्या पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता : आ. कोल्हे

कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा पाणीपुरवठा योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री बबनराव लोणीकर यांनी जागतिक बॅंक अर्थसाहायित जलस्वराज्य दोन योजनेअंतर्गत 16 कोटी 37 लाख 48 हजार 713 रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.तसा आदेश पाणीपुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी जयंत वाणी यांनी काढला असल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

आ. कोल्हे म्हणाल्या, पुणतांबाचे तत्कालीन सरपंच धनंजय जाधव व त्यांच्या सहकारी सदस्यांनी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला. याबाबत आपण मंत्रालय तसेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यासाठी शेती महामंडळाची जमीन मिळविली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंत्यांकडून तांत्रिक मान्यता मिळविली. जिल्हा तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे. योजनेस जागतिक बॅंकेकडूनन 70 टक्के, तर राज्य शासनाकडून 30 टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कामाचा प्रारंभ लवकरच होणार आहे. या योजनेमुळे पुणतांबा परिसरातील जनतेचा पाणीप्रश्‍न मार्गी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)