वाळू उपशामुळे पाणी योजना आल्या धोक्‍यात

संग्रहित छायाचित्र

संगमनेर तालुक्‍यातील साकूर परिसरात होतोय राजरोस अवैध वाळू उपसा

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यात मुळा नदीपात्राचे अवैध वाळू उपशामुळे वाळवंट झाले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांच्या पाणी योजना कोलमडल्या आहेत. मात्र त्याकडे महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून, तक्रारी केल्यावर तक्रारीचा फार्स त्यांच्याकडून केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी पावसाआभावी साकूर, जांबूत बु., जांबूत खु., मांडवे बु., मांडवे खु. परिसरातील मुळा नदीपात्रातील बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी अकोले तालुक्‍यातील पिंपळगावखाड धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. पाण्याअभावी हजारो हेक्‍टरवरील उभी पिके जळाली आहेत. मात्र सध्या कोरड्या पडलेल्या मुळा नदीपात्रातून वाळूचोर राजरोस मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करीत आहेत. सद्यःस्थितीत साकूर व जांबूत परिसरातून भरदिवसा रजरोज वाळू उपसा केला जात आहे.

“ज्या ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू असेल, त्याची माहिती मिळताच स्थानिक तलाठी संबंधित ठिकाणी जाऊन वाळू साठ्यांचा पंचनामा करेल. त्यानंतर संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. -साहेबराव सोनवणे, तहसीलदार, संगमनेर

वाळू माफिया दिवसाढवळ्या केणीच्या साह्याने वाळू उपसा करित आहेत. याच वाळूचा नदीकाठी मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला आहे. रात्रीच्या अंधारात या वाळूची वाहतूक केली जाते. या अवैध वाळू उपशाने नदी काठच्या गावांतील विहारींची पाणीपातळी खोल गेली आहे.

बेसुमार वाळूउपाशामुळे नदीपात्रात 15 फुटांपर्यंत खोल खड्डे पडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागत आहे. मात्र महसूल विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)