कर्मचाऱ्यांनी स्थायीचे कामकाज पाडले बंद

नगर – सानुग्रह अनुदान व 103 जणांना पदोन्नती मंजूर न केल्याने महापालिका कर्मचारी युनियनने थेट महापालिकेचे कामकाज बंद करून स्थायी समितीची चालू असलेली बैठकच बंद पाडली. यावेळी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना घेराव घालून कामकाज बंद केल्याने सभापती बाबासाहेब वाकळे यांना बैठक तहकुब करावी लागली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांबरोबर सायंकाळी झालेल्या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने कर्मचारी युनियनने आंदोलन मागे घेतले. महापालिका कर्मचाऱ्यांना साडेसात हजार रुपये प्रत्येकी देण्याचा निर्णय झाला. मात्र आठ दिवसांवर दिवाळी आली तरी अनुदान जमा न झाल्याने कामगार संतापले. स्थायी समितीची सभा सुरू असतानाच कामगार सभेत घुसले व घोषणाबाजी करून सभा बंद पाडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान सभापती वाकळे यांनी जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी मोबाईलवर चर्चा केली. मात्र अनुदान दिल्याशिवाय सभा चालू देणार नाही, असा पवित्रा कामगार युनियनने घेतल्याने सभा तहकूब करावी लागली.

निवड समितीने 103 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मंजूर केली. याबाबत युनियनने लक्ष वेधले. त्यानंतर तातडीने या 103 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. यावेळी युनियनचे अनंत लोखंडे व मुख्य लेखा परीक्षक चंद्रकांत खरात यांच्यात बाचाबाची झाली.

त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याचे ठरले. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. या चर्चेत अनुदान देण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)