मृत बालकांच्या कुटुंबीयांचे आ. थोरातांनी केले सांत्वन

संगमनेर – प्रवरा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या मंगळापूर येथील तीन मुलांचा शनिवारी (दि.27) पाण्यात बुडून मृत्यू झाला. या मृत मुलांच्या कुटुंबीयांची आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

मंगळापूर येथील समर्थ दीपक वाळे, रोहित चंद्रकांत वैराळ व वेदांत विनोद वैराळ हे प्रवरा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबीयांची आमदार थोरात यांनी भेट घेतली. जि. प. सदस्य रामहरी कातोरे, बाळासाहेब मोरे, रोहिदास पवार, सुरेश थोरात, भास्कर सिनारे, मारुती पवार, दादा पाटील वाळे, निवृत्ती वाळे, रामदास वाळे, रावसाहेब वाळे, माधव वाळे, सरपंच निवृत्ती वाळे, रूपवते, संभाजी वाळे, बाबासाहेब वाळे, सतीश भोकनळ आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेने संगमनेर तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे. सध्या कॉंग्रेस पक्षाची मराठवाड्यात जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. या घटनेची माहिती कळताच आ. थोरातांनी प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या. तसेच यात्रा मध्येच सोडून त्यांनी वैराळ व वाळे कुटुंबीयांची भेट घेतली.

आ. थोरात म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सर्वजण सहभागी असून, शासनाने आपद्‌ग्रस्त कुटुंबांना जास्तीत जास्त मदत करावी, अशा सूचना प्रशासनास केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)