मुकूंदनगरमधील सर्व जागा कॉंग्रेसला मिळतील : दीप चव्हाण

नगर – मुकुंदनगर प्रभाग हा पूर्वीपासून कॉंग्रेसला मानणारा आहे. या ठिकाणच्या सर्व जागा कॉंग्रेसला मिळतील असे प्रतिपादन कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केले. महापालिका निवडणुकीत प्रभागनिहाय उमेदवारसाठी शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे गोविंदपुरा येथील आयेशा मस्जिद चौक येथे आयोजित बैठकित ते बोलत होते.

यावेळी गौरव ढोणे, निजाम जहागीरदार, मंगल भुजबळ, सादीक शेख, हाजी चिनूभाई, शेख शहाबाज, सुलतान शेख, टिपू शेख, जावेद राजे, हाजी शफुद्दीन, शेख कैस, शाबीर शेख, इरफान शेख, बब्बू शेख, जाकीर सय्यद आदीसह मोठ्या संख्येने युवक वर्ग उपस्थित होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे प्रभागात बैठका घेण्यास प्रारंभ मुकुंदनगर पासून करण्यात आला. यावेळी प्रभागातील समस्या, अडीअडचणी कमिटीला सांगण्यात आल्या, या भागातून चारही उमेदवार निवडून येतील असे अनेकांनी सांगितले.

ढोणे यावेळी म्हणाले, सध्या राफेलवरून भाजपाचे काय चालले आहे, हे जनतेला कळायला लागले आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी स्वतः आज आंदोलनात उतरले आहे. त्यामुळे भाजपाबाबत लोकांचा भ्रम दूर होत आहे. पुन्हा कॉंग्रेसला चांगले दिवस येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)