शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिटन 111 रुपये वर्ग

File Photo

अॅड. माधवराव कानवडे : थोरात कारखान्यातर्फे परतीच्या ठेवीवरील व्याजही जमा

संगमनेर – दिवाळीनिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्या खात्यावर प्रतिटन 111 रुपये व विविध ठेवींवरील व्याज वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष ऍड. माधवराव कानवडे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

थोरात कारखान्याने मागील हंगामात साखरेचे बाजारभाव अत्यंत कमी असतानाही एफआरपी पेक्षा जास्त व सरसकट 2 हजार 300 रुपये भाव दिला. गेल्या वर्षभर शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. सर्व पिके तोट्यात गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुष्काळ व हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी 2017-2018 या हंगामात गळीतास आणलेल्या उसाचे प्रतिटन 111 रुपये ऊसउत्पादकांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना 2017-2018 हंगामासाठी आता एकूण 2 हजार 411 रुपये भाव मिळाला आहे. याचबरोबर सन 1994-1995 मध्ये ऊस पेमेंटमधून कपात केलेली परतीच्या ठेवीची रक्कमही परत केली जाणार आहे. तसेच 30 सप्टेबर 2017 अखेर जमा असलेल्या परतीच्या ठेवीवरील व्याजही सभासदांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.

ही सर्व रक्कम जिल्हा बॅंकेशी संलग्न खात्यात व श्री भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बॅंकेत जमा करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही कारखान्याने तालुक्‍यातील शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार यांच्यासाठी सुमारे 16 कोटी 30 लाख बॅंकेत वर्ग केले आहेत. तसेच सर्व सभासदंना 15 किलो मोफत साखरेचे वाटप 28 ते 30 ऑक्‍टोबर या काळात केले जाणार असल्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)