श्रीगोंदेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

श्रीगोंदे – येथील माध्यमिक शाळेत जाणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस रस्त्यात अडवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना आज (दि.26) सकाळी दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तेरा वर्षीय पीडित मुलगी सकाळी दहाच्या सुमारास शाळेत निघाली होती. काही अंतर चालत गेल्यावर आरोपीने पीडितेचा पाठलाग सुरु केला. रस्त्यात कुणी नसल्याची संधी साधत आरोपीने पीडितेचे तोंड दाबून आडोशाला नेत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितले तर ब्लेडने वार करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने शाळेत न जाता घडला प्रकार घरी जावून आईला सांगितला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)