मुशायराच्या जागतिक विक्रमासाठी डॉ. कमर सुरूर यांना निमंत्रण

नगर – एक शहर, एक मुशायरा, एक सूत्रसंचालक व 550 कवी मिळून सलग शंभर तास शायरी वाचन करण्यात येणार आहे. या मुशायराचा जागतिक विक्रम नोंदविला जाणार आहे. या मुशायरामध्ये आपल्या कविता सादर करण्यासाठी नगर येथील कवी डॉ. कमर सुरूर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

हा मुशायरा उत्तर प्रदेशातील दादरी येथे दिनांक 28 तारखेला रात्री 8 वाजता सुरू होईल. एक नोव्हेंबरला रात्री 12 वाजून एक मिनिटापर्यंत सलग शंभर तास म्हणजे तो चालणार आहे. यामध्ये जगभरातील 550 प्रसिद्ध कवी आपल्या रचना सादर करणार आहेत. या मुशायराला “मॅरेथॉन मुशायरा एवं कवी संमेलन विथ नदिमा फर्रुख’ असे नाव देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यात कवी जरी 550 असले तरी सूत्रसंचालक एकच असणार आहे. या विश्‍वविक्रमाची नोंद घेण्यासाठी “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ व “लिम्का बुक ऑफ रेकॉड’चे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)