भुतवडा तलावातून पोलीस बंदोबस्तात पाच विद्युत पंप जप्त

मुख्याधिकारी नाईकवाडेंच्या कारवाईनंतर शेतकऱ्यांची पळापळ

रात्रीतून पाणी चोरी होण्याची भीती

आरक्षित केलेल्या पाण्याची तलावातून रात्रीतून चोरी होण्याची शक्‍यता काहींनी वर्तवली आहे. मध्यरात्री विद्युत पंप टाकून तलावातील पाणी उपसा होण्याची शक्‍यता आहे. नगरपालिका पाणीपुरवठा यावर नियंत्रण ठेवणार का, असा प्रश्‍न केला जात आहे. ही पाणी चोरी थांबविण्यासाठी रात्रीचे गस्त पथक नेमण्याची मागणी करण्यात येत आहे.

जामखेड – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बिडा उगारला असून तलावातून पाच विद्युत पंप तहसीलदार तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात जप्त केले. पाणीटंचाईचे संकट लक्षात घेते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या भुतवडा तलावात 30 दशलक्ष घनफूट इतकेच पाणीसाठा शिल्लक आहे, असे असतानाही आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तलावातील हे पाणी विद्युत पंप लावून उपसा करण्याचा सपाटा लावला होता. तलावातून अनधिकृतरित्या पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपावर कारवाई करीत नगरपालिकेच्या पथकाने हे पाच पंप जप्त केले.

सध्या जामखेड तालुक्‍यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. सध्या तलावात अवघा 30 दशलक्ष घनफूट इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला असून त्यापैकी केवळ 10 दलघफू पाणीसाठा वापरा योग्य आहे. येत्या काळात पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही तर शहराला पाणीटंचाईच्या मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मागील महिन्यातही भूतवडा तलावाला नाईकवाडे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता जोशी, लघुपाटबंधारेचे ढेपे, जल व मृदूसंधारणचे साळुंखे, महावितरणचे गावित, टंचाई शाखाचे इनामदार यांच्या संयुक्‍त पथकाने भूतवडा तलावाची पहाणी केली होती. त्यावेळी पथकाने 10 स्टार्टर जप्त केले. काही विद्यूत मोटारींचे डायरेक्‍ट डिपीतूनच कनेक्‍शन असल्याचे आढळले. तेही कनेक्‍शन पथकाने तोडले होते.

“सध्या शहरासह तालुक्‍यात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यापुढे जर कोणी तलावातील पाणी उपसा केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत -विशाल नाईकवाडे, तहसीलदार.

अनेकवेळा नगरालिका प्रशासनाने अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांना तंबी दिली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध पाणी उपसा बंद करण्यासाठी नाईकवाडे यांना आदेश दिले होते. दि. 25 रोजी सायंकाळी पथकाने पोलिसांचा फौजफाटा घेवून भुतवडा तलावात गेले. त्याठिकाणी सुमारे 5 विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी उपसा सुरु असल्याचे आढळून आले. पथकाने पाणी उपसा करणाऱ्या पाच विद्युत पंप जप्त केले. नाईकवाडे त्यांच्या कारवाईने भुतवडा तलावातून अनधिकृतरित्या पाणी उपसा करणाऱ्याना चांगलाच चाप बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)