जिल्हयाबाहेर चारा वाहतुकीस बंदी

नगर – जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेला चारा इतर जिल्ह्यात जाऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये. यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त झालेल्या आदेशानुसार जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यास बंदी करण्यात आल्याचे आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2018 अखेर पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी असल्याने तसेच पुढील कालावधीत पावसाची अशाश्‍वती निर्माण झाल्याने जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई व जनावरांना चाराटंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे चाऱ्याची पळवापळवी होऊन त्यातुन मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. या आणिबाणीच्या प्रकरणी संबंधीतावर नोटीस बजावणे शक्‍य नाही. हा आदेश निर्गमित झाल्यापासून दोन महिन्याच्या कालावधीसाठी अंमलात राहील असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)