दहावीच्या विद्यार्थ्यांना पुर्वीप्रमाणे 20 गुण मिळावेत

सुनिल गाडगे : शिक्षक भारतीने घेतली शिक्षण मंत्र्यांची भेट

नगर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने भाषा विषयांचे अंतर्गत गुण रद्द करुन 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय मार्च 2019 पासून घेतला आहे. 20 गुण काढून घेतल्याने विद्यार्थ्यांना 100 गुणांची लेखी परिक्षा द्यावी लागणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा 100 गुणांचा पेपर होणार असल्याने गुण मिळवितांना विद्यार्थ्यांची दमछाक होणार आहे. याआधी बेस्ट ऑफ फाईव्हसाठी शिक्षक भारतीने पाठपुरावा केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी तो मान्य केल्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला व अकरावी प्रवेशासाठी होणारे नुकसान टळले. आताही विद्यार्थ्यांना पुर्वीप्रमाणेच अंतर्गत मिळणारे 20 गुण देण्यात यावेत, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली.

दहावीच्या विद्यार्थ्यांना पुर्वीप्रमाणे 20 गुण मिळावेत म्हणून राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनिल गाडगे, शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उपाध्यक्ष शिवाजी सोसे, महिला कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी,महिला राज्य प्रतिनिधी शकुंतला वाळुंज, जया गागरे, छाया लष्करे, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर, माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, शहर जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, विजय लंके, शरद धोत्रे, सुनिल जाधव, जिल्हा सचिव मोहम्मद समी शेख, अशोक धनवडे, श्रीकांत गाडगे, ग्रथपाल संघटनेचे अध्यक्ष विलास गाडगे, जिल्हा महिलाध्यक्षा आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, महानगर महिला अध्यक्षा माधवी भालेराव, बेबीनंदा लांडे, जयश्री ठुबे, मंजुषा गाडेकर, शारदा लोंढे, साधना शिंदे आदींनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी सीबीएसई, आयसीएसई, आयबी या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण जवळपास 100 पैकी 40 पर्यंत गुण दिले जातात. एसएससी बोर्ड आतापर्यंत विद्यार्थ्यांना 20 अंतर्गत गुण देते होते. मात्र गुणवत्तेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मिळणारे अंतर्गत गुण एसएससी बोर्डाने रद्द केले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशास पात्र एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.

निकोप स्पर्धा न होता अंतर्गत गुणांच्या आधारावर इतर बोर्डाचे विद्यार्थी चांगली महाविद्यालये पटकावून नेणार असतील तर निश्‍चितच पालकांचा ओढा इतर बोर्डाच्या शाळांकउे आपोआप वाढेल. त्यामुळे सीबीएसई व इतर बोर्डा अंतर्गत गुणांची खिरापत बंद करावी किंवा एसएसी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण पुन्हा सुरु करावेत, असे सुनिल गाडगे यांनी शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी सांगितले. कि, आपल्या पत्राचा, विचारांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन निर्णय घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)