अण्णा हजारे यांचे वरातीमागून घोडे?-जालिंदर चोभे

माजी पदाधिकारी चोभे यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे टीका

नगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे उपोषण वाजत गाजत संपले. पण ज्या प्रश्‍नासाठी 2011 मध्ये आणि आता, उपोषण करण्यात आले तेंव्हाचे प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. जनलोकपाल कायदा आणण्यासाठी अण्णांचे उपोषण संघाच्या साथीने देशासह-परदेशात गाजले.

या आंदोलनामुळे कॉंग्रेसला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले, तर भारतीय जनता पक्षाला राज्यासह केंद्रात सत्ता काबीज करता आली. देशात मोदी विरोधक टोकाला गेली असताना अण्णांचे उपोषण म्हणजे वरातीमागून घोडे कशासाठी हा प्रश्‍न त्यांचे माजी पदाधिकारी कार्यकर्ते जालिंदर चोभे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

भ्रष्टाचाराने उग्ररूप धारण केले असताना आरबीआय, सीबीआय, न्यायव्यवस्था, नितीआयोग मानवाधिकार आणि विद्यापीठ आयोग अशा अनेक घटनात्मक संस्थांच मोडीत काढून लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावला जात आहे. लोकपाल सारख्या नव्या संस्था निर्माण करून लोकशाही बळकट कशी होईल? सरकारच्या हिंदूत्ववादी सनातनी वृत्तीमुळेच हेमंत करकरे, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश सारख्या विचारवंतांची हत्या झाली.

अनेक विचारवंत मारले गेले. जातीय व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढली असून, शेतकरी आत्महत्या करीत आहे. निवडणुकीत ईव्हीएमचे घोटाळे झाल्याचे उघड झाले असताना अण्णांनी या प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असेही चोभो यांनी पत्रकात म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)