नेवाशातील दोघांना अटक

नगर – खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पसार असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. लहू ज्ञानदेव सोनवणे व त्याचा साथीदार सोमनाथ भाऊसाहेब बर्वे (रा. घोडेगाव, ता. नेवासे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. घोडेगावातील चांदा चौकातून या दोघांना अटक करण्यात आली आहे. सोमनाथ बर्वे याच्याविरोधात राहुरी, सोनई व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्य मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)