मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चार रस्त्यांसाठी पाच कोटी- आ. कोल्हे

कोपरगाव  – तालुक्‍याच्या पूर्व व पश्‍चिम भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चार रस्त्यांच्या कामांस मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 5 कोटी 72 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

आ. कोल्हे म्हणाल्या, ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्यात राज्य मार्ग 7 ते मढी खुर्द ते प्ररामा 12 या 2.40 किलोमीटर रस्त्यासाठी 1 कोटी 38 लाख 45 हजार, चासनळी ते दहीवाडी एल 85 ग्रामीण मार्ग 94 या 1.75 किलोमीटरसाठी 1 कोटी 4 लाख 47 हजार, राज्यमार्ग 65 ते करंजी या 2.82 किलोमीटरसाठी 1 कोटी 41 लाख 70 हजार, तर राज्य मार्ग 65 तिळवणी ते आपेगाव या 3.13 किलोमीटरसाठी 1 कोटी 87 लाख 55 हजार, अशा चार रस्त्यांसाठी 5 कोटी 72 लाख 17 हजार रुपये खर्चाच्या कामास प्रशासकीय मान्यता ग्रामविकास विभागाचे उपसचिव र. आ. नागरगोजे यांनी दिली. त्याबाबतचा आदेश 10 जानेवारी रोजी काढण्यांत आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार कोल्हे पुढे म्हणाल्या, या प्रशासकीय मान्यतेमुळे दळणवळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागून त्याचा परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे. याकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे आदींचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)