पिंपळगाव खांडचे पाणी बाहेर जाऊ देणार नाही – आ. पिचड

संगमनेर : तालुक्‍यातील खंदरमाळवाडी येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार विभव पिचड. (छाया- नितिन शेळके)

संगमनेर – दुष्काळी परस्थिती लक्षात घेता घरात आलेल्या पाव्हण्याला आपण तांब्याभर पाणी दिले. मात्र पाव्हणा तांब्या आणि कळशी घेऊन घराबाहेर पडायला लागला तर कुठेतरी आपण त्याला अडवतो. तीच भूमिका पुढील काळात ठेवावी लागेल. पाणी देऊन जर काही मंडळी आपल्याला शिव्या देत असतील तर आपण बघत बसचायाच का यापुढे लाभ क्षेत्राच्या बाहेर पिंपळगाव खांडचे पाणी दिले जाणार नसल्याचे आमदार वैभव पिचड यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीत पिंपळगाव खांड धरणातून मुळा नदी पात्रात पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पठारभागातील मुळा नदीकाठच्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने आमदार वैभव पिचड यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, यावेळी पिचड बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, मीनानाथ पांडे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढोले उपस्थितीत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी मीनानाथ पांडे म्हणाले, दुष्काळी परस्थिती लक्षात घेऊन लाभ क्षेत्राबाहेर प्रमाणिकपणे पाणी जाऊन दिले. मात्र काही लोक पाण्यावर हक्क दाखवायला लागले. पुढील काळात पाण्याचे योग्य नियोजन आमदार पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल.

यावेळी बाळासाहेब ढोले म्हणाले, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या दूरदृष्टीमुळे हे धरण साकारले आहे. या प्रकल्पाला आदिवासी उपायोजनेतून आर्थिक तरतूद करण्यात आली होती. संगमनेर व अकोले तालुक्‍यातील मुळा नदीवरील विविध कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये तलावातून सोडलेले पाणी अडवले जाते. तेवीस गावांमधील सुमारे 1 हजार 778 हेक्‍टर क्षेत्रास उपसा सिंचनाद्वारे त्याचा लाभ होतो. पठार भाग साहेबांच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही.

यंदा अत्यल्प पावसामुळे मुळा नदी लगत असलेल्या पाणी पुरवठा योजना बंद पडल्या होत्या. पिंपळगाव खांड धरणातून आवर्तन सुटल्याने नदीकाठच्या शेतकरी वर्गाच्या विहरी व कुपनलीकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. चारा पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळाला. त्यामुळे आज मुळा नदीकाठच्या कोठे खुर्द, पानसवाडी, आंबी-खालसा, खंदरमाळवाडी, येठेवाडी, लहूचामळा, घारगाव, अकलापूर, अभाळवाडी, बोरबन, कोठे बु. आदी गावांमध्ये शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आमदार पिचड यांचे जंगी स्वागत करत सत्कार केला.

यावेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके, खंदरमाळवाडी सरपंच वैशाली डोके, आंबी-खालसा सरपंच सुरेश कान्होरे, गणेश लेंडे, गणेश आभाळे, गणेश सुपेकर, सुशील आभाळे, संतोष शेळके, नामदेव गाडेकर, सुरेश गाडेकर, संतोष घाटकर, प्रमोद लेंडे, चेतन कजबे आदींसह भेट दिलेल्या सर्वच गावांमध्ये मोठ्या संखेने शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)