जोशाबाच्या आंदोलकांनी ‘एसपी’समोर वाजविले डफडे

नगर : पाथर्डी तालुक्‍यातील कासार पिंपळगाव येथील बलभीम छबुराव कांबळे या दलित युवकाचा ऑगस्ट 2018 खून झाला आहे. या खुनातील आरोपींना अटक न झाल्याने मयतच्या घऱ्चे आणि जोशाबा सेवा संघाने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर डफडे बजावो आंदोलन केले.

जोशाबा सेवा संघाचे अध्यक्ष देवराम सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले. योगेश भोसले, संदीप पारधे,मच्छिंद्र वैरागर, संदीप शिंदे, बापूसाहेब मंडलिक, प्रणव भोसले, पप्पू पारधे, प्रतीक पारधे, दिगंबर कांबळे, सुदाम भोसले, अर्जुन वैरागर, गणेश वैरागर, श्रावण काते, बाबासाहेब काते आंदोलनात सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मयत बलभीम कांबळे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक व्हावी. या खुनाच्या गुन्ह्यात ऍट्रोसिटी ऍक्‍टनुसार कलम वाढवावे. मयताच्या वारसांना 10 लाखांची मदत झालीच पाहिजे. पीडित कुटुंबातील एकास शासकीय नोकरी मिळाली पाहिजे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)