चोखोबा-तुकोबा दिंडीतून सामाजिक संदेश

नगर- सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता जाती भेद ,धर्मभेद वाढत चालला आहे .महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे .समाजाला सामाजिक समरसतेचा संदेश व्या शतकापासून तुकाराम ,ज्ञानेश्‍वर ,चोखामेळा ,एकनाथ महाराज आदींनी दिला आहे. विठ्ठल भेटीसाठी वारकरी जातो तेव्हा वारीत लहान, मोठा ,जात ,पात ,स्त्री ,पुरुष असा कोणताच भेद केला जात नाही .प्रत्येकजण माउली म्हणून एकमेकांच्या पाया पडतो.हीच परम्परा जपून चोखोबा -तुकोबा दिंडीतून सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात येत आहे .यामुळे सामजिक समरसता वाढीस लागेल व चांगल्या समाजाची निर्मिती होईल.असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी केले.

पुणे येथील संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चोखोबा ते तुकोबा ” एक वारी समतेची ” हि दिंडी संत चोखा मेळा कर्मभूमी मंगळवेढा ते जगदगुरु संत तुकोबाराय जन्मभूमी देहू अशी सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी रथयात्रा काढण्यात आली. नगर येथील चैतन्य फाउंडेशनच्या पुढाकाराने या रथयात्रेच्या स्वागत पेमराज सारडा महाविद्यालयात हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांच्या हस्ते करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)