शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याचे काम केले – आ. कोल्हे

कोपरगाव : शेतकऱ्याला कुठलाही पक्ष नसतो. आपल्याच मतदारसंघात तर जो उपोषणाला बसला असेल, तर त्याच्या भावना जाणून घेऊन त्याच्या समस्या सोडविण्यांवर आपला भर असतो, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या शिकवणीतून आपण आजवर ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, त्या त्या ठिकाणी हजेरी लावून प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करीत असते. त्यामुळे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सुरू केलेल्या उपोषणस्थळी गेले होते. हा आपला आणि तो दुसरा, असा भेदभाव करण्याचा कुठलाच मानस आपला नव्हता, असे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.

चालू वर्षी कोपरगाव तालुक्‍यात अत्यल्प कमी पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांची पूर्णपणे धूळधाण झालेली आहे. त्यामुळे कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रा. राम शिंदे व संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले असता, तेथेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळ प्रश्नावर चर्चा केली. असे असतानाही जर कुणी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांत राजकारण आणून त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ते आपण कदापिही सहन करणार नाही. खरीप पिके तर गेलीच. पण रब्बीची देखील शाश्वती नसल्याने येथील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा द्यावा, असेही आमदार कोल्हे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)