साईंच्या झोळीत 14 कोटींचे दान

अकरा दिवसांत साडेनऊ लाख भाविकांनी घेतले दर्शन

30 लाखांचे परकीय चलन

साईबाबांच्या दानपेटीत 19 देशांचे जवळपास 30 लाख 63 हजार रुपयांचे परकीय चलनही आलेले आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सौदी अरबीया, दक्षिण आफ्रिका, युरो, न्यूझिलंड, श्रीलंका, नेपाळ, ओमान, कुवेत, थायलंड, अरब अमिराती, कतार आदी देशांच्या चलनाचा समावेश आहे.

शिर्डी – सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शिर्डीत भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. दरम्यान 22 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात साईच्या झोळीत 14 कोटी 54 लाख दान मिळाल्याचे साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दिवसेंदिवस साईबाबांवरील भाविकांची श्रद्धा वाढत असून, नाताळची सुटी असल्याने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. मागील अकरा दिवसांत साडेनऊ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतल्याचे चंद्रशेखर कदम यांनी सांगितले.

यादरम्यान साई बाबांच्या झोळीत दानाचा विक्रम करीत यंदा नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने अकरा दिवसांत 14 कोटी 54 लाख दान भाविकांनी टाकले आहे. गेल्या वर्षीच्या दानाच्या तुलनेत 30 लाखांनी दान घटले आहे. साईबाबांवर लाखो भाविकांची श्रद्धा असल्याने ते नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साई समाधीचे दर्शन घेणण्यासाठी आले होते.

यावर्षी भाविकांच्या गर्दीत मात्र वाढ झालेली दिसून आली. मागील वर्षी नाताळ व नववर्ष उत्सवात दक्षिणा पेटीत भाविकांनी सुमारे 14 कोटी 82 लाख रुपयांचे दान टाकले होते. त्या तुलनेत यावर्षी देणगी स्वरुपात देणगी काउंटरवरुन सुमारे 8 कोटी 5 लाख रुपयांचे दान केले आहे. तसेच चेक, डीडी, मनिआँर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, असे 3 कोटी रुपयांचे दान केल आहे.

याच दरम्यान 14 लाख 28 हजार रुपये दान सोन्याच्या रुपाने आले असून, 4 लाख 82 हजारांची 16 किलो 500 ग्रॅम वजनाची चांदी आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रसादालयात सहा लाख 7 हजार 484 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे. तीन लाख भाविकांना मोफत बुंदीची पाकिटे देण्यात आली. 6 लाख 34 हजार 758 लाडू पाकिटांच्या विक्रीतून 1 कोटी 58 लाख 68 हजार 950 रुपये प्राप्त झाले आहेत, तर 9 लाख 41 हजार 200 मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे दर्शनरांगेतून साईभक्तांना मोफत वाटप करण्यात आले आहे. यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, लेखा विभागाचे खराडे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)