दुष्काळाच्या तीव्रतेनुसार मनरेगाच्या कामांसाठी तालुक्‍याचे तीन विभाग : भवारी

संग्रहित छायाचित्र.....

शेवगाव – तालुक्‍यावर निसर्गाच्या लागोपाठ झालेल्या अवकृपेमुळे पाणीटंचाई वाढली असल्याने सद्यस्थितीत पंचवीस टॅंकरद्वारे 21 गावे व 52 वाड्या- वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात असून रिकाम्या हातांना काम उपलब्ध करुन दिलासा देण्यासाठी दुष्काळाच्या तिव्रतेनुसार नरेगाच्या कामासाठी तालुक्‍याचे अतीकठीण, कठीण व सर्वसाधारण असे तीन विभाग करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मंजूर कामे सेल्फवर ठेवण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी दिली.

भवारी म्हणाले, दुष्काळी स्थितीला सामोरे जाण्यासाठी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, उपसभापती शिवाजीराव नेमाने व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीने उत्कृष्ट नियोजन केले आहे. पावसाअभावी शेतात काम नाही. उद्योग व्यवसाय मंदावले आहेत, त्यामुळे बेकारांची संख्या वाढली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मजुरांना पुरेशी कामे उपलब्ध व्हावीत यादृष्टीने पुरवणी विकास आराखडा 2019-20 मध्ये रस्ते, पाझर तलावातील गाळ काढणे, सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी, प्राथमिक शाळांची मैदाने, शाळा कंपाऊंड अशी मंजूर प्रधान कामे प्रामुख्याने सर्व ग्रामपंचायतींच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. तालुक्‍यात मागणीनुसार मजुरांना पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा याची दक्षता घेण्याबरोबरच या कामातून सार्वजनिक मालमत्ता निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.

तसेच ग्रामपंचायत व राज्ययंत्रणेंतर्गत सन 2019-20 च्या आराखड्यात कामनिहाय तब्बल आठ हजार शंभर कामांचा समावेश करण्यात आला असून त्यात अकुशल कामांसाठी 6486.03 लाख तर कुशल कामांना 3671.39 लाख रूपये अशी एकूण 10157. 42 लाख रुपयांची अंदाजपत्रकीय रक्कम आहे.

या कामातून सार्वजनिक मालमत्ता निर्माण व्हावी या उद्देशाने या कामांमध्ये शेततळी ,रेशीम उद्योग, गुरांचे गोठे, शेळी व कुक्कुटपालन शेड, नापेड कंपोस्ट (अभिसरण), व्हर्मी कंपोस्ट ,अझोला उत्पादन ,सार्वजनिक जागेवरील गोदाम अशा अनेक कामांचा यात समावेश करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)