सोनोशी- पुणे बससेवा सुरू करण्याची मागणी

File photo

पाथर्डी – तालुक्‍यातील पूर्व भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी पाथर्डी आगाराने सोनोशी- पुणे बससेवा सुरू करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य सुनीता गोकुळ दौंड यांनी आगार प्रमुखांना निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डीच्या पूर्व पट्ट्यातील लोकांना विविध कामांसाठी पुणे येथे जावे लागते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांचा व पालकांचा पुणे येथील प्रवास नेहमीचाच झाला आहे. शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी तालुक्‍यातील नागरिक नेहमीच पुणे येथे जातात.

तालुक्‍यातील पूर्व भागातील लोकांना पुणे येथे जाण्यासाठी पाथर्डीला यावे लागते. काहींना तर चक्क तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास खाजगी वाहनाने करावा लागतो. यामध्ये महिला व मुलांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोनोशी ते पुणे बससेवा सुरू केल्यास जिरेवाडी, कोनोशी, निंबादैत्य नांदूर, कोरडगाव, कोळसांगवी, औरंगपूर ,तोंडोळी, फुंदे टाकळी या परिसरातील विविध गावांच्या प्रवाशांची सुविधा होणार आहे.

नागरिक वेळेत निघून पुणे येथे वेळेत पोहोचून आपापली कामे करू शकतात. लोकप्रतिनिधी या नात्याने परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे वेळोवेळी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सोनोशी पुणे बस सेवा तत्काळ सुरू करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)