वरिष्ठ वेतनश्रेणीचा जाचक अध्यादेश रद्द करा : आव्हाड

संगमनेरच्या पेन्शन हक्क संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

नगर – राज्य सरकारने 23 ऑक्‍टोबर 2017 रोजी काढलेला जाचक अध्यादेश रद्द करावी यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शाखा पदाधिकाऱ्यांनी संगमनेरमधील तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. हा जाचक अध्यादेश रद्द करावा यासाठी पदाधिकायांनी तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन दिले. जुनी पेंशन हक्क संघटनचे उच्चाधिकार समितीचे सदस्य शिवाजीराजे आव्हाड यांच्या मार्गदर्शमाखाली हे आंदोलन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य सरकारच्या या आदेशामुळे वरिष्ठ वेतनश्रेणी काढून घेतली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असून, यातून असंतोष निर्माण होत आहे. हा अन्यायकारक अध्यादेश रद्द झाला नाही, तर संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

संगमनेर तालुका सरचिटणीस नीलेश हारदे, जिल्हा प्रतिनिधी नितीन केंगार, तालुका प्रसिध्दीप्रमुख विकास खेबडे, तालुका कोषाध्यक्ष संतोष झावरे, तालुका उपाध्यक्ष अशोक मधे, गणेश शेंगाळ, दत्तात्रय काळे, धोंडीबा गोडे, नानास देव्हारे, संजय साबळे, प्रवीण गाडेकर, महिला प्रतिनिधी संगमनेर रणरागिणी कल्याणी साठे, माधवी राऊत, मनीषा दातीर निवेदन देताना उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)