स्वस्थ भारत सायकल यात्रा नगरमध्ये दाखल

नगर - नाशिक विभाग अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने काढण्यात आलेल्या स्वस्थ भारत यात्रेचे नगरमध्ये स्वागत करण्यात आले.

आरोग्यदायी आहाराबाबत केली जातेय जनजागृती

नगर – अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वस्थ भारत यात्रा सायकल रॅलीचे मंगळवारी (दि. 11) सकाळी नगर शहरात आगमन झाले. या यात्रेद्वारे आरोग्यदायी आहाराबाबत जनजागृती केली जात आहे. शहरातील गांधी मैदान परिसरातील प्रगत माध्यमिक विद्यालयात या यात्रेचे आगमन झाल्यावर विद्यार्थ्यांच्यावतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी विभागीय सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके अन्न व औषध प्रशासनाचे नगरमधील सहायक आयुक्त किशोर गोरे, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत सोनार, दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य सुनील पंडित, नाशिक विभागीय अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर, आकाशवाणीचे समालोचक जयंत ठोंभरे, पवी कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी आदिनाथ बाचकर, शरद पवार, उमेश सुर्यवंशी, का. सु. शिंदे, विवेक पाटील, निलेश धुंडाळे, आनंद पवार, किशोर साळुंके आदी उपस्थित होते.

यावेळी नाशिक विभागीय अन्न व औषध प्रशासनसह आयुक्त चंद्रशेखर साळुंके म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण मार्फत स्वस्थ भारत यात्रा सुरु केलेली आहे. आपल्या देशात एका बाजूला लठ्ठपणाची तर एका बाजूला कुपोषणाची समस्या आहे. चुकीच्या अन्न सवयी हे यामागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे या रॅलीद्वारे स्वस्थ शरीर, निरोगी आरोग्य, स्वच्छ अन्न याबाबत जनजागृती केली जात आहे.

देशातील 6 वेगवेगळ्या ठिकाणाहून 16 ऑक्‍टोबर रोजी सायकल रॅली निघाल्या असून त्या 26 जानेवारी 2019 रोजी दिल्ली येथे पोहचणार आहेत. या यात्रेनिमित्त शाळांमधून निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा याचे आयोजन केले जात आहे, असे सहआयुक्त साळुंके म्हणाले. यावेळी प्रगत विद्यालयातील विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्यासाठी चांगल्या सवयी अंगिकारण्याची शपथ देण्यात आली. यावेळी प्रा. हर्षाली देशमुख यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)