सोशल मिडीया हे आभासी जग – कापरे

शेवगाव – सोशल मिडीया हे आभासी जग आहे. त्यातून बाहेर पडून तरुणांनी समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहचावे, समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना शोधाव्यात, असे आवाहन अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक मंडळाचे विश्वस्त वकील वसंत कापरे यांनी केले.

शेवगाव येथील न्यू आर्टस्‌ महाविद्यालयाच्या वतीने अमरापुर येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या उद्‌घाटन प्रसंगी कापरे बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रावसाहेब कासार, बाजार समितीचे संचालक राजाजी बुधवंत, माजी सरपंच विजय पोटफोडे, उपप्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.गोकुळ क्षीरसागर, एन.सी.सी.प्रमुख नारायण गोरे आदी प्रमुख उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वकील. कापरे म्हणाले की, सध्या दुष्काळामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून करण्यासारखी भरपूर कामे गावामध्ये उपलब्ध आहेत. जलसंधारण व पर्यावरण संवर्धन यासारख्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त समर्थ भारत अभियान व सक्षम युवा समर्थ भारत हा उपक्रम राबिण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्या अंतर्गत वनराई बंधारे, ग्राम स्वच्छता, धार्मिक स्थळांची स्वच्छता, संगणक साक्षरता, व्यसनमुक्ती इत्यादी उपक्रम ठरविले आहेत.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप मिरे यांनी केले. तर सुत्रसंचालन डॉ. अनिता आढाव यांनी केले. प्रा. नितीन निपुंगे यांनी आभार मानले. या शिबीराच्या यशस्वितेसाठी मनोज टेकुळे, शैलेश पाथरकर, लहू चितळे, शिवांजली भोसले परिश्रम घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)