जनावरे छोडो आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले

पालकमंत्र्यांच्या चोंडी निवासस्थानी राष्ट्रवादीचे आंदोलन; बारा जणांना अटक व सुटका

जामखेड – पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी चारा छावण्याबाबत संतापजनक वक्‍तव्या केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ते चोंडी येथील ना. शिंदे यांच्या निवासस्थानी जनावरे छोडो आंदोलन करण्यासाठी गेले असता पोलीसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन आज हाणूण पाडले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार व पालकमंत्री यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बारा जणांना पोलिसांनी अटक केली. व सायंकाळी जामीनावर सुटका केली.

पालकमंत्री शिंदे यांनी पाथर्डी येथे शेतकऱ्यांनी जनावरांच्या चारा व छावणीबाबत प्रश्‍न उपस्थित केला असता यावेळी त्यांनी आपली जनावरे पाहुण्यांकडे सोडवा असे वक्तव्य केल्याने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ना. शिंदे यांच्यावर टिकेची झोड उठली. तसेच सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर टिका झाली. याच अनुषंगाने आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देवून पालकमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

त्यानंतर चार वाजता जनावरे घेवून चोंडी येथे जाणार असे सांगितले होते. चार वाजता जनावरे घेवून पालकमंत्र्यांच्या घरासमोर जात असताना चारही रस्त्यावर नाकाबंदी करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्त्यांची “सरकार हमको डरती है, पोलीस को आगे करती है गली मे शोर है भाजपा सरकार चोर है’.अशा घोषणा दिल्या. ना.शिंदे यांच्या घराला पोलीसांचा चोहोबाजूंनी 100 मीटर अंतरावर वेढा घातला होता. शीघ्र कृती दल पाचारण करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांना अडवले.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, युवा नेते अक्षय शिंदे, प्रा.मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, श्‍याम कानगुडे, अमजद पठाण, अमित जाधव, डॉ.कैलास हजारे, नितीन हुलगुंडे, वैजीनाथ पोले, सुरेश भोसले, प्रदिप पाटील, शरद शिंदे, शुभम मोरे, संभाजी राळेभात, गणेश हागवणे, नितीन धांडे, सुनिल कथले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यापैकी प्रा. मधुकर राळेभात, किशोर मासाळ, अमजद पठाण, शाम कानगुडे, संभाजी राळेभात, नितीन धांडे, नितीन हुलगुंडे, अमित जाधव, कैलास हजारे, गणेश हगवणे, व अक्षय शिंदे, सुनिल कथले अशा बारा जणांना अटक करण्यात आली व जामीनावर सुटका करण्यात आली. आरोपींना जामिनावर सोडवण्यासाठी ऍड. हर्षल डोके यांनी मदत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)