पालकमंत्री शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शहरटाकळीत निषेध

भावीनिमगाव – पालकमंत्री तथा जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पाथर्डीच्या दुष्काळ दौऱ्यात दुष्काळी मदत मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला. चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा, या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शेवगांव तालुक्‍यातील शहरटाकळी येथे निषेध करण्यात आला.

प्रा. शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे गुरूवार पासून राज्यभरात राजकीय पडसाद उमटले. मंत्री शिंदेंच्या भूमिकेवर सर्वस्तरातून जोरदार टिका झाली. मंत्री शिंदेंचा सोशल मिडीयावर अनेकांनी निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या वतीने मंत्री शिंदेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी ( दि.7 ) निषेध सभा घेण्यात आली. निषेध सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव होते.

यावेळी भायगावचे माजी सरपंच राजेंद्र आढाव, मजलेशहरचे आप्पासाहेब फटांगरे यांनी भाषणातून निषेध नोंदवला. यावेळी ऍड. अनिल मडके, बाळासाहेब जाधव, देवटाकळी चे सरपंच ज्ञानदेव खरड, उपसरपंच अशोक मेरड, शहरटाकळीचे माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे, प्रशांत वेलदे, संतोष शेटे, प्रदीप गवळी, अरुण लोखंडे, राजेंद्र बरबडे, राजेंद्र काकडे,अनिल मेरड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)