‘श्रीगणेश’ने शैक्षणिक गुणवत्ता राखली

ज्ञानेश्वर वाकचौरे : वार्षिक क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ 

कोपरगाव – ग्रामीण भागात शाळा सुरू करणे म्हणजे मोठी अडचण असते. या शाळा सुरू करताना संस्थाचालकांपुढे अनेक अडचणी येतात. परंतु श्रीगणेश संस्थेने सर्व परिस्थितीवर मात करून ग्रामीण भागातील विद्यार्थी घडविले, असे प्रतिपादन शिक्षणविस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी केले.

-Ads-

कोऱ्हाळे येथील श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला. त्यावेळी वाकचौरे बोलत होते. यावेळी श्रीगणेश संस्थेचे सचिव प्रा. विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, विश्‍वस्त भरत शेटे, सी.ई.ओ. प्रा. राहुल वल्टे, जुनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रा. रियाज शेख, प्राचार्य रामनाथ पाचोरे, प्रशासकीय अधिकारी प्रा. बापू पुणेकर, सुपरवायझर प्रवीण चाफेकर, पंकज खडांगळे यांच्यासह पालक उपस्थिती होते.

वाकचौरे यांच्या हस्ते क्रीडाज्योत पेटवून वार्षिक क्रीडा सप्ताहाला सुरुवात झाली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळाच्या मैदानावर देखील आपला सहभाग नोंदविला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही मैदानावर येणार नाही, तोपर्यंत देशाचे भावी खेळाडू निर्माण होणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही मैदानावर खेळणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाहीत.

हारणे व जिंकणे हा खेळाचा भाग आहे. परंतु मैदानात उतरताना आपण जिंकण्याच्या उद्देशानेच उतरावे. श्रीगणेश ही भावी काळात झपाट्यने पुढे येणारी संस्था असेल. या वार्षिक क्रीडा सप्ताहाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख प्रा. विजय गाढवे यांनी केले, तर पाहुण्याचे आभार प्रा. मनीषा ढगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक दिलीप दुशिंग व सर्व सहकारी प्राध्यपकांनी प्रयत्न केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)