डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी वाटचाल करावी

संजय सुखधान : डॉ. आंबेडकरांना नेवासाफाटा येथे अभिवादन 

नेवासाफाटा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी नेवासाफाटा येथे प्रतिमेसह अशोक चक्रास पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नुसतेच प्रतिमेस हार घालून चालणार नाही तर त्यांचे विचार आचरणात आणून कृतिशील कामातून वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी संजय सुखधान यांनी यावेळी बोलताना केले.

-Ads-

यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बहुजन समाजाचे नेते व घटनापती सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक संजय सुखधान, गणपत मोरे, माऊली देवकाते, सुशील धायजे, पप्पू कांबळे, गणेश झगरे, मुकींदपूर ग्रामपंचायतचे सरपंच सतीश निपुंगे, बबलू साळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव वाकचौरे,भास्करराव लिहिणार, गोविंदराव ब्राम्हणे, विजय दहिवाळकर,  चंद्रकांत कदम यांच्या हस्ते अशोकचक्रास व प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी सुखधान म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असतांना दुसरीकडे शौयदिन साजरा करणे हे मनुवादी प्रवृत्तीचे लक्षण आहे. या मनुवादी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असे सांगून ते म्हणाले, आम्ही खातो तो घास व घेतो तो श्वास म्हणजेच बाबासाहेब आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आतापर्यंत मनुवादी प्रवृत्तीमुळेच देशाची मोठी हानी झाली असल्याचे सांगत त्यांनी याबाबत देवगिरी किल्ल्‌यासह सोरटी सोमनाथ मंदिर हल्ल्याचे उदाहरण यावेळी बोलताना दिले.

26/11 चा हल्लादेखील संविधान दिनीच कसा होतो, हे मोठे षडयंत्र असून मनुवादी प्रवृत्तीचाच हात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नुसतेच गळ्यात व हातात फोटो घालून चालणार नाही तर मनुवादी वृत्तीला गाडण्यासाठी त्यांचे विचार कृतिशील कामाच्या माध्यमातून आचरणात आणा व त्याप्रमाणे वाटचाल करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)