राशीन ग्रामस्थांचे पाण्यासाठी धरणे आंदोलन

कर्जत – राशीन ग्रामपंचायतीतील प्रभाग तीन मधील नागरीकांना गेली महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने, युवक नेते विक्रम राजेभोसले व ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीत डफडे वाजवून धरणे आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने त्वरीत पाईपलाईन दुरूस्त करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गेली दहा दिवसांपूर्वी तोंडी व लेखी निवेदन देऊनही कोणतीच कारवाई न केल्याने अचानक ग्रामस्थांना बरोबर घेऊन आंदोलन करावे लागल्याचे विक्रम राजेभोसले यांनी सांगितले. या प्रभागातील सिमेंट रस्ता होण्याआगोदर नियमीत पाणी येत होते. मात्र हे काम करीत असताना पाण्याचा व्हॉल्व बंद केला आहे. त्यामुळे येथील नागरीकांना पाणी येत नाही. याचे कारण विचारले असता पक्का झालेला सिमेंट रस्त्याचे खोदकाम करता येत नसल्याचे कारण समोर केले जात आहे.

सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने सुटलेल्या पाण्याचा साठा करावा लागत आहे.असे असताना गेली 40 दिवसांपासून प्रभागातील नागरीकांना पाणी नाही. या आंदोलनाची दहा दिवसांपूर्वी नागरीकांच्या सह्यांचे निवेदन ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, अशोक जंजीरे, प्रवीण आंधळकर, माजी सरपंच रामकिसन साळवे, दादा परदेशी, अमोल शेटे, ऍड.राहुल जाधव, ऍड. दिलीपचंद मंडलेचा, रहिम मुंढे, जितेंद्र शेटे, नितीन शेटे, महेश शेटे, स्वप्नील ओहरा, सागर चिंतामणी, विजय बोधे, सचिन टाक, अशोक टाक, बंटी पखाले, निलेश मैड आदी ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी विनोद देशमुख, भीमराव साळवे, उपसरपंच साहेबराव साळवे यांनी आंदोलनादरम्यान तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)