मनपा निवडणुकीसाठी दोन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

नगर  – महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी सांगता झाली आहे. प्रशासनाने त्याचबरोबर आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा चोख असा फास आवळला आहे. जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस दलाने कार्यवाही सुरू केली आहे. आजपासून पुढील चार दिवस शहराला पोलीस छावणीचा वेढा असणार आहे. मतदान, मतमोजणीच्या दिवशी आणि मतमोजणीनंतर दुसऱ्या दिवशी शहरात दोन हजार पोलीस कर्मचारी तळ ठोकून असतील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली. केडगाव, सावेडी, मुकुंदनगर आणि सारसनगर हा भाग अतिसंवदेनशील असून येथे प्रामुख्याने आमचे लक्ष राहील, असेही त्यांनी सांगितले.

शर्मा म्हणाले, “दोन अतिरीक्त पोलीस अधीक्षक, सहा उपअधीक्षक, 22 पोलीस निरीक्षक, 85 सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, एक हजार पोलीस कर्मचारी, 50 गृहरक्षक दलाचे जवान, एसआरपीएफचे 150 जणावर, शीघ्रकृती दलाचे तुकडी, पेट्रोलिंग पथक आणि त्याबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे असतील आणि अतिरीक्त कारवाईसाठी राखीव पोलीस बंदोबस्त राहील.’ महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. शहरात सध्या आठ ठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे.

अवैध दारू वाहतूक, पैशाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. मतमोजणीचे ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीच्या ठिकाणाकडे येणारे रस्ते बंद राहणार आहेत. त्याला पर्यायी रस्ते खुले करण्यात आले आहेत. स्थानिक रहिवाशांना दळणवळणाला त्रास होऊ नये म्हणून त्यांना पास देण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.

नेते व पक्ष कार्यालयांना बंदोबस्त

मतमोजणीच्या दिवशी पक्ष कार्यालय, उमेदवार, उमेदवाराचे घर व नेत्यांच्या कार्यालयांना बंदोबस्त देण्यात येणार आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात या काळात गस्त वाढविण्यात येणार आहे. संशयरित्या फिरणाऱ्यांवर किंवा समाज माध्यमांवर आक्षेपार्ह संदेश देणाऱ्यांवर सायबर सेलमार्फत लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)