जिल्हा संगणक टंकलेखन संघटनेच्या कार्यकारिणीची निवड

शेवगाव – अहमदनगर जिल्हा संगणक टंकलेखन संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत येथील टाईपर्स कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संजय बोरुडे यांची संगणक तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांच्या उपस्थितीत या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बोरुडे यांनी संघटनेचा. कोणताही संस्थाचालक संगणक युगात मागे राहता कामा नये, यासाठी संस्थाचालकांना लागेल ती तांत्रिक मदत, ऑनलाईन ट्रेनिंग, अशा विविध माध्यमांतून मदत करण्याची ग्वाही दिली .

-Ads-

कार्यकारिणी :  जिल्हाध्यक्ष- जालिंदर चौरे, कार्याध्यक्ष- अनुराधा थिटे, कोषाध्यक्ष- शीला गवळी, सरचिटणीस- संजय कांबळे. याशिवाय अन्य वीस जणांची कार्यकारिणीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)