हसणे हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र – डॉ. तोडकर

पाथर्डी – निसर्गाची अनमोल देन असलेल्या आयुर्वेदामुळे आपण कायम निरोगी जीवन जगू शकतो. आपले आरोग्य आपल्या हातात आहे. त्याला दुसऱ्याच्या हातात सोपवू नका. हसत खेळत जीवन जगा. हसणे हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचारतज्ञ डॉ. स्वागत तोडकर यांनी केले.

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे व माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त पाथर्डी शहरात सामाजिक परिवर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पाथर्डी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले निसर्ग उपचारतज्ञ डॉ. तोडकर यांचे व्याख्यान संपन्न झाले.

यावेळी आ.मोनिका राजळे, नगरसेवक प्रवीण राजगुरू, नामदेव लबडे, प्रसाद आव्हाड, रमेश गोरे, नंदकुमार शेळके, अनिल बोरुडे, नगरसेविका दीपाली बंग, मंगल कोकाटे, शारदा हंडाळ, सुनीता बुचकुल, दुर्गा भगत, संगीता गटांनी, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, सुनील वोहळ, विष्णुपंत अकोलकर, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, काशीबाई गोल्हार, कोमल तोडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग खेडकर, बंडू पठाडे, उत्तम गर्जे आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हसत खेळत घरगुती उपचार या विषयावर व्याख्यान देताना डॉ. तोडकर म्हणाले, निसर्गाच्या सान्निध्यात आपण कायमस्वरूपी निरोगी राहू शकतो. फक्त निसर्गाने दिलेल्या आयुर्वेदाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. डॉक्‍टरांना देवाच्या रूपात पाहिले जाते. मात्र या क्षेत्रातील काही मंडळी पैशाच्या मागे धावू लागल्याने डॉक्‍टरांवरील विश्वास उडाला आहे. डॉक्‍टरांनी रोग्याला पैशात मोजणे चुकीची गोष्ट आहे.

मोजक्‍या लोकांच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागत आहे. प्राचीन काळापासून आयुर्वेदिक उपचार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आयुर्वेदिक उपचार करून निरोगी जगा. हॉस्पिटलमध्ये कमीत कमी वेळा जा, कमीत कमी गोळ्या घ्या, दवाखाना जेवढा मोठा तेवढा उपचार चांगले असा एक गैरसमज झाला आहे.

आपल्या सभोवती असणाऱ्या आयुर्वेदिक औषधातून आपण असाध्य आजारातून बरे होऊ शकतो हे सिद्ध झाले आहे. दररोज घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टीचा उपयोग करून आपण असाध्य आजार दूर ठेवू शकतो. अशा अनेक घरगुती उपचाराची माहिती डॉ. तोडकर यांनी यावेळी दिली. आयुष्यात सर्वात अधिक आरोग्याला महत्त्व द्या. हसत खेळत आयुर्वेदिक उपचार करून निरोगी राहण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. राजीव राजळे या कर्तृत्ववान व्यक्तींना आपण मुकलो आहोत. आयुष्यात मला 40 हून अधिक पुरस्कार मिळाले. मात्र या महान हस्तींच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाला मिळालेली संधी माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असल्याचे तोडकर शेवटी म्हणाले. महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा दिपालीताई बंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)