धनगरसमाजाची आदिवासींमध्ये घुसखोरी नको – ढवळे

कोपरगाव – देशातील वंचित घटक म्हणून आदिवासी जमातीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिले आहे. मात्र सध्या धनगर समाज आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू पाहत असून, तसे झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलने उभे करू, असा इशारा एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी दिला.

आद्य क्रांतिकारक तंट्या मामा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत शिवाजीराव ढवळे बोलत होते. ढवळे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांत शासकीय योजना आदिवासी समाजापर्यंत पोहचवण्यास आतापर्यंतचे सर्वच राजकीय पक्ष अपयशी ठरले आहेत. या योजना गिळंकृत करण्याच्या उद्देशाने धनगर समाज आदिवासी आरक्षणात घुसखोरी करू पाहात आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला साईबाबा कॉर्नर ते आंबेडकर मैदान अशी रॅली काढण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष गोरख नाईक यांनी केले. प्रदेश सचिव किरण ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष पवन सोनवणे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश औताडे यांनी केले, तर आभार गोरख नाईक यांनी मानले.

कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अशोक माळी, युवा जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, दक्षिण जिल्हाध्यक्ष गिताराम बर्डे, जिल्हा संपर्क प्रमुख अशोक मोरे, जिल्हा सचिव रंगनाथ आहेर, युवा जिल्हा सचिव दीपक ठाकरे, युवा कार्याध्यक्ष भाऊराव पवार, सुनील वाघ, उत्तम पवार, राजू पवार, करण मोरे, नाना पवार, सुभाष पवार, सुखदेव माळी, भाऊसाहेब माळी, दिलीप पवार, प्रसाद सोनवणे, दीपक मोरे, रामदास पवार, नवनाथ आहेर, बाबासाहेब सोनवणे, विशाल गायकवाड आदींसह समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोपरगाव तालुका पदाधिकारी, युवा, टायगर फोर्स महिला आघाडी आदींनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)