धनगर, मुस्लिम आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती होऊ देणार नाही – मासाळ

जामखेड – मराठा आरक्षणाचा विषय गाजतोय, मात्र सरकारने मराठा आरक्षण दिले असले तरी ते न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. तसेच सरकारने मेगा भरती सुरू केली आहे. याला आमचा विरोध नाही मात्र धनगर व मुस्लिम समाजाला जोपर्यत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मेगा भरती होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी केले.

हजरत टिपु सुलतान, बिरसा मुंडा जयंती, महात्मा फुले स्मृतीदिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दूशाळा येथे एम. जे. ग्रुप जामखेड यांच्या वतीने सार्वजनिक अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मासाळ बोलत होते.

-Ads-

कार्यक्रमादरम्यान अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, सभापती सुभाष आव्हाड, शिवसेना तालुका प्रमुख शहाजीराजे भोसले, राष्ट्रवादीचे युवा नेते अमजद पठाण, कॉंग्रेस युवा सेवादल तालुका अध्यक्ष जमिर सय्यद, नगरसेवक अमित चिंतामणी, पवन राळेभात, अवदुत पवार, भगवान गीते, अरुण जाधव, विकास मासाळ, शाकीर शेख, अर्शद शेख, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, वसीम (बिल्डर) कुरेशी, हुसेन मुल्ला, सलमान सय्यद, मुजाहेद कुरेशी, वसीम सय्यद, सिजान सय्यद, अवेज कुरेशी, वसीम इनामदार सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मासाळ म्हणाले, महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम, धनगर व शेतकरी आंदोलन सुरू आहेत. मात्र सरकारच्या दबावापोटी ही आंदोलने चिरडून टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हा डाव राष्ट्रवादी हाणून पाडल्याशिवाय राहाणार नाही. यानंतर व्याख्याते अमोल मिटकरी म्हणाले, अनेक महापुरुषांच्या जयंती साजरी होतात मात्र टिपु सुलतान यांची जयंती कोणी साजरी करत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे.

टीपु सुलतान यांनी हिंदुची अनेक मंदिरे बांधली. टिपु सुलतान यांचा काळ इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहुन ठेवला आहे. एवढी मोठी ख्याती त्यांची आहे. ब्रिटिशांच्या विरोधात बंडाचे हत्यार टिपु सुलतान यांनी उपसले होते. भारताच्या इतिहासात कधी संविधान जाळलं नाही ते या सरकारच्या काळात जाळले जाते अशी टीका देखील त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)