शरीराने अपंग असलोत तरी मनाने आम्ही सक्षम

कोपरगाव - जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक क्रिकेट अॅकडमीच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जमीर पठाण : कोपरगावात रंगला दिव्यांगांचा क्रिकेट सामना

कोपरगाव – आम्ही शरीराने जरी दिव्यांग असलो, तरी मनाने नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट संघाचा कर्णधार जमीर पठाण यांनी व्यक्त केली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कोपरगाव तालुक्‍यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक क्रिकेट ऍकॅडमीच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पठाण बोलत होते.

आत्मा मालिक संकुल संघा विरुद्ध महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघात (मुंबई) 20-20 सामना खेळविण्यात आला. यावेळी पठाण बोलत होते. ते म्हणाले, आम्ही शरीराने दिव्यांग आहोत. मनाने कुठेच कमी नाही. मनामध्ये जिद्द असेल, तर कोणत्याच गोष्टीची उणीव भासत नाही. आयुष्याचा प्रत्येक सामाना यशस्वी खेळू शकतो. त्यासाठी मनाची एकाग्रता, जिद्द व चिकाटी याची गरज आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये मुंबई दिव्यांग क्रिकेट संघाने आपल्या खेळाची चुनूक दाखवून अनेकांना भुवया उंचवावयास लावले आहे.

पठाण हे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी आहेत. त्यांना उजवा पाय नसतांनाही गोलंदाजी, फलंदाली व क्षेत्ररक्षण करून क्रिकेटचे मैदान ते गाजवत आहेत. त्यामुळेच त्यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघामध्ये निवड करण्यात आल्याची माहिती दिव्यांग क्रिकेट संघाचे प्रशिक्षक संजय चव्हाण यांनी दिली. चव्हाण म्हणाले, या खेळाडूंना शासनाच्या पाठबळाची, आर्थिक व मानसिक बळाची गरज आहे. दिव्यांग असूनही हे खेळाडू क्षेत्ररक्षण, गोलंदाजी व फलंदांजी करून हा सामना जिंकला आहे.

वारीचे सरपंच सतीश कानडे यांच्या हस्ते सामन्याला प्रारंभ करण्यात आला. प्रथम फलंदाजी मुंबई दिव्यांग संघाने केली. हा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. विश्‍वात्मक जंगली महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी संघास शुभेच्छा दिल्या. यावेळी संकल्प सिद्धी संस्थेचे प्रमुख विष्णू भागवत, श्‍यामकर्ण होन व पोलीस पाटील सुरेश गमे यांच्या हस्ते या खेळाडूंना क्रिकेट साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल कोपरगाव येथील दिव्यांग क्रिकेट संघाचे करीम पटेल यांनी आभार मानले.

यावेळी पोलीस पाटील सुरेश गमे, आत्मा मालिक क्रिकेट ऍकॅडमीचे प्रशिक्षक बोळीज, करीम पटेल देशमुख यांच्यासह विविध क्रिकेट संघांचे प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संघात कोपरगावचे करीम पठाण व अक्षय रत्नपारखी यांचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)