पालकमंत्री शिंदे, आ. राजळे यांचा गौरव 

जायकवाडी पाणी योजना सुरळीत

पाथर्डी  : राक्षी येथील जायकवाडी योजनेचा उद्भव सुरू होण्यासाठी आ. मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. माजी आ.स्व.राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघातील सर्वात किचकट प्रश्न सुटल्याने आगामी टंचाई काळात पाण्याचे टॅंकर भरण्यातील अडचण दूर झाली, यामुळे पाथर्डी शेवगाव पाणीप्रश्‍नासह विविध पाणी योजना सुरळीत होणार असल्याने पालिकेच्यावतीने नगरसेवक दिपाली रामनाथ बंग यांनी पालकमंत्री राम शिंदे व आमदार मोनिका राजळे यांचा गौरव करत शहराच्या वतीने जाहीर आभार मानले.

शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली, यावेळी ज्येष्ठ नेते अर्जुन शिरसाठ व सोमनाथ खेडकर, पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, गोकुळ दौंड, नगरसेवक रमेश गोरे, जमीर आतार ,अनिल बोरुडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना बंग म्हणाले, आमदार मोनिका राजळे यांनी राक्षी उद्भव सुरू करण्यासाठी सुमारे दोन महिने अहोरात्र परिश्रम घेतले.

पाथर्डी शेवगाव तालुक्‍यातील टंचाईग्रस्त भागाला टॅंकरचा शाश्वत उद्भव सुरू झाल्याने टंचाईचा आगामी कालावधीत पाण्याचा उद्भवसाठी आता विस्कळित होणार नाही. शासनाने प्रथमच असा धाडसी निर्णय केवळ राजळे यांच्याकडून वेधण्यात आलेल्या समस्येचा तिव्रतेमुळे घेऊन सर्वच पाणी योजनांचा वीजपुरवठा टंचाईसाठी सुरू झाला. प्रश्नाचे श्रेय घेण्याची धडपड विरोधकांकडून होऊन पाणीप्रश्‍नात राजकारण आणले जात आहे.

निव्वळ ठरावावर वीजपुरवठा सुरू झाला असता तर वीज वितरण कंपनीने कायमस्वरूपी वीज खंडित करण्याचे प्रकार कायमस्वरूपी थांबवले असते. राजळे यांचे कार्य व त्यांचा जनाधार बघुन विरोधकांकडे टीकेचे मुद्दे उरले नाहीत. त्यामुळे विकास कामांमध्ये लुडबूड करून विरोधक राजकीय अस्तित्व जपण्याची धडपड करीत आहेत.

आमदार राजळे यांनी दुष्काळाशी संबंधित प्रशासकीय यंत्रणा, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करीत असल्याने तीव्र टंचाईच्या काळात लोकांना दिलासा मिळत आहे. पालिका हद्दीतील शासकीय हातपंपाची खोली वाढविण्यासाठी आमदारांनी आदेश देण्याची बंग यांनी मागणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)