ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या अडवणुकीची तक्रार

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील ग्रामीण रुग्णांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नगर जिल्ह्यातील सर्वांत मोठे सरकारी ग्रामीण रुग्णालय शहराजवळील घुलेवाडी येथे बांधण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्याऐवजी त्रास देण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप लहूजी सेनेचे तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण भास्कर गायकवाड यांनी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे केला.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयात प्रत्येक वेळी केस पपेरचे दहा रुपये आकारणी केली जाते. रक्त, लघवी तपासणी तसेच एक्‍स-रेचे प्रत्येकी शंभर रुपये घेतले जातात. ज्येष्ठ नागरिकांना वयाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी देखील शंभर रुपये आकारले जातात. तसेच याबाबत कुठलीही पावती रुग्णांना दिली जात नाही.

-Ads-

तत्काळ उपचारांसाठी रुग्ण आल्यास डॉक्‍टर उपलब्ध नसतात. सोनोग्राफीची सुविधा नाही. येथील डॉक्‍टर एक ते दीड तास रुग्णालयात थांबतात. त्यानंतर आपल्या खासगी दवाखान्यात सेवा देतात. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गायकवाड यांनी निवेदनात केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)