शास्त्रज्ञांचे माणसाच्या विकासात मोठे कार्य – आव्हाड

जामखेड : दिव्यांग मुलांना जागतिक दिव्यांग दिनानिमित्त साहित्य वाटप करण्यात आले.

दिव्यांग मुलांना जागतिक दिव्यांग दिनानिमित्त साहित्य वाटप

जामखेड – लुईस ब्रेलसारख्या शास्त्रज्ञाने अंधांसाठी ब्रेल लिपी शोधून काढली. दिव्यांगांच्या जीवन प्रकाशमय केले. दिव्यांगांच्या जीवनात प्रकाश यावा याकरिता नव्या संशोधनासाठी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे. शास्त्रज्ञांनी माणसाच्या विकासात मोठे कार्य केल्याने, जगाशी सहजतेने माणूस जोडला गेला आहे, हा विज्ञानाचा अविष्कार आहे, असे प्रतिपादन जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना केले.

-Ads-

येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तालुक्‍यातील 31 दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी अध्यक्षीय भाषणात सभापती आव्हाड बोलत होते. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, उपसभापती सुर्यकांत मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, नगराध्यक्ष निखिल घायतडक, नायब तहसीलदार रणदिवे, बालविकास प्रकल्प अधिकारी सानप, नगरसेवक गणेश आजबे, संदीप गायकवाड, हृषीकेश बांबरसे, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, कल्पना झिंजूरडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, दिव्यांग लाभार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम लुईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

गटशिक्षण अधिकारी पोपट काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तहसीलदार नाईकवाडे म्हणाले, शासनातर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना राबविल्या जातात. 1995 पासून दिव्यांगांना कायद्याने 3 टक्के आरक्षण दिले असून, राजीव गांधी अपंग सहाय्यता योजनेत भरीव रकमेची वाढ केलेली आहे. अपंगांना डोळ्यासमोर ठेऊन सुलभ निवडणुकीची आखणी केलेली आहे.

तालुक्‍यात नुकतीच पावसाळी खो-खो स्पर्धा पार पडली. त्यामध्ये पिंपळगाव उंडा जिल्हा परिषद येथील 14 वर्षे वयोगटातील दोन विद्यार्थिनींनी जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. जनाबाई बाळू ढगे या विद्यार्थिनीचा राज्यस्तरीय निवड झाली. तसेच शिवानी हनुमंत गव्हाणे हिची विभागीय स्तरावर निवड झाल्याने, या दोन विद्यार्थिनींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील 31 दिव्यांग विद्यार्थ्यांना सायकल, क्रचर, व्हीलचेअर, संगणक प्रणाली आदी साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बापूसाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)