भूदानयज्ञ जमीन स्मशानभूमीस देण्याची आयुक्तांकडे मागणी

नेवासे – नेवासा तालुक्‍यातील पुनतगाव येथील ग्रामस्थांनी भूदानयज्ञ जमिनीची सार्वजनिक स्मशानभूमीसाठी नोंद करावी, अशी मागणी नाशिक येथील विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत यापूर्वीही ग्रामस्थांनी नाशिक येथील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदारांशी पत्रव्यवहार केलेला आहे. यास आठ महिने उलटूनही याबाबत कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.

सध्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्याने नदीला पाणी आहे. त्यामुळे अंत्यविधीस अडचणी येत आहेत. त्यामुळे गावाती माय-लेकरांचे अंत्यविधी रस्त्यावर करण्यात आले आहेत. गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीस अडचणी येतात. त्यामुळे ग्रामस्थांनी स्मशानभूमी न झाल्यास ग्रामपंचायलयत कार्यालयासमोरच अंत्यविधी करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीने तत्काळ ग्रामसभा घेऊन स्मशानभूमीचा ठराव करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

ग्रामसभेत पुनतगाव येथील भुदानयज्ञ जमीन स्मशानभूमीसाठी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. ग्रा. पं. सदस्य कादर अहमद शेख यांनी सूचना मांडली, त्यास ग्रा. पं. सदस्या नंदाबाई वसंत वाघमारे यांनी अनुमोदन दिले.तसेच गावातील दोन ग्रामस्थांनी गावातील नदीलगतची जमीन सार्वजनिक स्मशानभूमीसाठी देण्याची व त्या मोबदल्यात ग्रामपंचायतीच्या ताब्यातील एक एकर जमीन मिळावी, अशी लेखी मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

याप्रकरणी तत्काळ कारवाई न झाल्यास 17 डिसेंबर रोजी शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करणार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पुनतगावचे सामाजिक कार्यकर्ते दीपक धनगे, फकीर वरुडे, सतीश वाकचौरे, श्‍याम काळे, अशोक वाकचौरे, त्रिंबक वाकचौरे, योगेश वाकचौरे, प्रसाद वाकचौरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

#प्रभात_प्रभाव : अखेर पुनतगाव स्मशानभूमीसाठी ठराव मंजूर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)