नेवासा येथील मतमाऊली यात्रेत भाविकांची मांदियाळी 

नेवासा फाटा – नेवासा येथील गंगानगर प्रभागात असलेल्या कॅथोलिक आश्रमाच्या ज्ञानमाऊली चर्चमधील मतमाऊली यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त रात्री पवित्र मिस्सा बलिदानाचा धार्मिक विधी नाशिक धर्मप्रांताचे प्रमुख रेव्हरंट लुर्डस डॅनियल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. देवाप्रमाणेच एकमेकांवर प्रीती करा त्याच्या वचनावर विश्वास ठेवून जीवनात जगण्याचा प्रयत्न करा असे आवाहन रेव्हरंट लुर्डस डॅनियल यांनी यावेळी बोलताना केले.

शनिवारी मतमाऊली यात्रेनिमित्त सायंकाळी 5 वाजता सजवलेल्या रथामध्ये मतमाऊली मातेच्या मूर्तीची नेवासा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे फटाक्‍यांची आतषबाजीने स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूकीचा समारोप चर्च प्रांगणात झाल्यावर पवित्र मिस्सा बलिदानाच्या धार्मिक विधी झाला.

यावेळी बोलताना रेव्हरंट लुर्डस डॅनियल म्हणाले की देवाची भक्ती करून त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निष्कलंक अंतकरणाने देवाचे वचन सर्वांनी स्विकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मानवी संबधात व नात्यात आज जो दुरावा निर्माण झालेला दिसत आहे तो जाऊन हे नाते वृद्धिंगत होऊ दे, सर्व वाईटापासून आम्हाला दूर ठेव अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी ज्ञानमाऊली चर्चचे प्रमुख फादर प्रकाश राऊत, फादर अँड्रयू जाधव, फादर मायकल, फादर दिलीप जाधव यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन ख्रिस्ती धर्मगुरू व भाविक यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व धर्मगुरू व भाविकांचे ज्ञानमाऊली चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांनी स्वागत केले. यावेळी सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी तसेच देशाची एकता व अखंडता मजबूत राहण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी इंजिनीअर नगरसेवक सुनील वाघ, राजेंद्र परदेशी, आयुर्विमा महामंडळाचे बाळासाहेब सोनवणे, सिस्टर जोत्स्ना, सिस्टर साली, सिस्टर बिंदू, यात्रा कमिटीचे सदस्य लाजरस पंडित, रविंद्र पवार, मार्कस बोर्डे,सचिन धोंगडे, उत्तम गायकवाड, आशाताई चक्रनारायण यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

मतमाऊली यात्रेनिमित्त ज्ञानमाऊली चर्चवर तसेच माऊलीच्या डोंगरावर भव्य रोषणाई करण्यात आली होती. ही रोषणाई सर्वांचे आकर्षक ठरली होती. मंदिर प्रांगण गर्दीने फुलून गेले होते. उपस्थित भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)