पांढरीपूल येथे पाण्यासाठी शेतकऱ्यांचा ‘रास्तारोको’

नेवासे – वांबोरी पाईपलाईन चारीतून बंधारे भरुण घेण्याची तरतूद असूनही टाळाटाळ केली जात असल्याने सोमवारी (दि.3) नेवासे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी हक्काच्या पाण्यासाठी रास्तारोको आंदोलनाचे हत्यार उपसले. वांबोरी पाईपलाईनच्या चारीतून हक्काचे पाणी मिळावे यासाठी 19 नोव्हेंबरला वांजोळी येथे 4 गावाच्या शेतकऱ्यांनी 3 दिवस उपोषणही केले होते.

यावेळी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी 14 तलाव भरुन देण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. या आश्‍वासनानंतरही पाणी सोडले नसल्याने तलाव कोरडेठाक ठेवल्याने पिण्याच्या पाणी व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने आज अहमदनगर-औंरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे रास्तारोको आंदोलन केले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

काशिनाथ पागिरे, सुनील वीरकर, रामनाथ खंडागळे, भरत गर्जे, पालवे मामा यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलतांना बद्रीनाथ खंडागळे म्हणाले, आम्ही उपोषण केले त्यावेळेस अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधी यांनी आम्हाला आश्वासन दिले होते. परंतु आम्हाला पाणी मिळाले नाही. नगर, पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यातील तलाव भरून दिले आहेत,परंतु नेवासा तालुक्‍यातील तलाव का भरून दिले जात नाही असा प्रश्‍न पडला आहे.

आ. बाळासाहेब मुरकुटे हे फक्त खोटे आश्वासन देत आहेत, अन्य तालुक्‍यात तलाव भरत असतांना आमदारांना दिसत नाही का? पाण्यापासून 14 गावांना वंचित आहेत. आहे, यासाठी आमदार व अधिकारी जबाबदार असून यासाठी यापुढे मोठे आंदोलन केले जाईल.

वांजोळी, लोहोगाव, मोरेचिंचोरे, धनगरवाडी या गावांचा जनावरांच्या चारा-पाण्यासह, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून वांबोरी पाईपलाईन चारीतून या तलावात पाणी सोडण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पाईपलाईन चारीतून राहुरी तालुक्‍यातील प्रस्थावित सर्व तलाव भरल्याकडे या आंदोलकांनी लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर नगर आणि पाथर्डी तालुक्‍यातील तलाव यातून भरण्याचे काम चालू असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

नेवासा तालुक्‍यातील तलाव यातून आदयापही भरून देण्याकडे जाणीवपुर्वक दूर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दुष्काळी परिस्थिती असल्याने पशुधन विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे याची नुकसान भरपाई शासनाने दयावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. वांबोरी चारीवरील इतर तालुक्‍यात तलाव भरले जातात, मग नेवासे तालुक्‍यातील का नाही? वांबोरी चारीतून पाणी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आमच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप आंदोलनकर्ते करत आहेत.

यावेळी नेवासेचे नायब तहसीलदार जयकर यांना निवेदन देण्यात आले. 4 दिवसात संबधित सर्व विभागाची बैठक घेतली जाईल असे आश्वासन नायब तहसीलदारांनी दिले. सोनई पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)